तळेगांव दाभाडे ता.९:येथील रुडसेट संस्थेला शेळके यांनी आज दि.९ रोजी सदिच्छा भेट दिली व कामकाजाचा आढावा घेतला. संस्था करत असलेले कामकाज चालू असलेल्या ब्युटी पार्लर व्यवस्थापन या प्रशिक्षणार्थींची संवाद साधला.तसेच मावळ मधिल युवक-युवतींनी रुडसेट संस्थेतील प्रशिक्षणचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आमदार सुनील शेळके यांनी आवाहन केले.
रुडसेट संस्था खऱ्या अर्थाने लोकांना आर्थिक संपन्न करत आहे. महिलांसाठी चालू असलेले प्रशिक्षण हे विनामूल्य देत आहेत याबद्दल कौतुक केले. संस्था करत असलेल्या कामाला अजून चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याकरता जागा उपलब्ध करून देऊ . तसेच काही दिवसांमध्ये संस्थेचे स्वतःच्या वास्तूमध्ये प्रशिक्षण चालू होईल व संस्थेचा असलेला उद्देश हा पुढे नेण्यासाठी तुम्हाला नेहमी सहकार्य राहील असे शेळके यांनी बोलताना सांगितले.
यावेळी आमदार सुनील शेळके, रुडसेट संस्थेचे संचालक प्रवीण बनकर , कार्यक्रम प्रमुख दिनेश निळकंठ सर ,हरीश बावचे सर ,योगिता गरुड मॅडम , रवी घोजगे सर, माजी सरपंच विश्वनाथ मराठे, माजी सरपंच निलेश मराठे, अरुण मराठे आदी महिला प्रशिक्षणार्थी उपस्थीत होते.

